karnataka

------------कर्नाटक------------






कर्नाटक  हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.












कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तामिळनाडू ही राज्ये येतात. 








राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू, व तमिळ ह्याही भाषा बोलल्या जातात.





कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु= उच्च अथवा उत्कर्षित व नाडू = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा त्यांपैकी एकअर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु= काळा रंग + नाडू= भूमी. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.





कर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणार्‍या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. .













कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदिच्या काठावरील एक खेडेगाव. येथे विजयनगर साम्राज्याचे अनेक अवशेष आहेत (इ. स. १३३६). हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असून जागतिक पुरातत्त्व परंपरा स्थळ आहे.